आश्वासन पूर्ण न केल्याने फडणवीसांना कोल्हापूरकरांनी धरलं धारेवर म्हणाले…

कोल्हापूर : मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकण, सातारासह कोल्हापूरच मोठं नुकसान झालं आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षातील नेते प्रत्यक्ष जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर दौरा करत असताना नागरिकांच्या रोषाला समोर जाव लागलं आहे.

कोल्हापूरातील चिखली गावातील पाहणी दौरा उरकून फडणवीस ग्रामस्थांशी संवाद साधत होते. यावेळी एका ग्रामस्थाने फडणवीसांचं बोलणं अर्ध्यात थांबवून पोटतिडकीने ओरडत आपल्या व्यथा मांडण्यास सुरुवात केली. आश्वासन देऊन ते पूर्ण न केल्यानं आज कोल्हापूरातील चिखली गावातील ग्रामस्थांनी फडणवीसांना खडेबोल सुणावले आहेत.

‘साहेब मागच्या वेळेला चंद्रकांतदादा आले होते. याच मंदिरात त्यांनी पण शब्द दिला होता. आमचा मारुती साक्षीला आहे. त्यानंतर दोन वर्ष कुठे गेलं हो प्रशासन’, असा सवाल उपस्थित करत या ग्रामस्थाने संताप व्यक्त केला आहे. तसेच इथून जाऊन तुम्ही तुमच्या कामाला लागणार आम्ही आमच्या, परत कोणी इकडे येणार नाही, असं देखील या ग्रामस्थाने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा