InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

फडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार की यांनाही ‘क्लीन चीट’ देणार?

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. मंत्री हे जनतेचे रक्षक आणि सेवक असतात. मात्र, ते कर्तव्यदक्ष नाही राहिले असे या प्रकरणात स्पष्ट दिसते. गिरीश बापट यांनी आपल्या पदाचा गैरवापर करुन आणि कायद्याचा अवमान करत अशा प्रकारचे अनेक आदेश जुमानले नाहीत असे ताशेरे हायकोर्टाने ओढले आहेत.

यावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटर च्या माध्यमातून टीका करत मुख्यमंत्री बापटांना राजीनामा घेणार की क्लीन चीट देणार असं टोमणा अजित पवारांनी मारला आहे.

काय होत अजित पवारांचं ट्विट
उच्च न्यायालयानेच सरळसरळ गिरीश बापट यांच्यावर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवलेला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. आता देवेंद्र फडणवीस बापट यांचा राजीनामा घेणार की यांनाही ‘क्लीन चीट’ देणार ?

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.