InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘राज्यात भाजपचे सरकार येणार, हा फडणवीसांचा शब्द’

राज्यात भाजपचे सरकार येणार, हा फडणवीसांचा शब्द आहे अस मत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडले. 164 जागा लढलो त्यापैकी 105 जागा आम्ही जिंकलो. 59 जागी आमचा पराजय झाला. त्यापैकी 55 जागेवर आम्ही 2 नंबरवर आहोत. पराभव झालेल्या 59 उमेदवारांची आज बैठक होती ती संपन्न झाली.

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव होऊनही सर्व उमेदवारांची मानसिकता सकारात्मक आहे. येणाऱ्या ग्राम पंचायत जिल्हा पंचायत महानगर पालिका निवडणुकांत हे सर्व पुढाकार घेणार आहेत. अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. या बैठकीतून मुख्यमंत्री यांनी या सर्वाना राज्यात भाजप साजरा येणार असल्याचा विश्वास दिला आहे. आणि येणाऱ्या सरकारमध्ये सर्वांना योग्य तो सन्मान दिला जाईल. अस आश्वासन दिलं आहे

Loading...

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.