फडणवीसजी, तुमच्या वाचाळवीरांना आवरा, दरेकर माफी मागा नाही तर, परिणामाला सामोरे जा; राष्ट्रवादीचा गंबीर इशारा

मुंबई : लावणी सम्राज्ञी आपल्या लावलीने रसिकांना साद घालणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. सुरेखा पुणेकर यांच्या पक्षप्रवेशावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टोला लगावला आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला. “या पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा पक्ष आहे,” अशी टीकाही यावेळी दरेकरांनी केली होती. यावरून उस्मानाबादेत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी प्रवीण दरेकरांना इशारा दिला आहे.

दरेकर यांनी २४ तासांत माफी मागावी. अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे वंगण फासणार असल्याचा इशारा सलगर यांनी दिलाय. माफी मागा अथवा नाही तर परिणामाला सामोरे जा, असे आव्हानही सलगर यांनी दिले आहे. भाजप हा महिलांच्या बाबतीत हीन मनोवृत्ती दर्शवणारा पक्ष, दरेकर यांचे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे. फडणवीसजी, तुमच्या वाचाळवीरांना आवरा. राम कदम, परिचारक आणि आता दरेकर यांना आवरा असा टोला सक्षणा सलगर यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा