InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जमिनीच्या वादातून गोळीबार, नऊ जणांचा मृत्यू, २५ जखमी

- Advertisement -

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जमिनीवरुन झालेल्या या हिंसाचारामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि तीन महिला आहेत.

घोरावल कोतवाली भागात उभ्भा गावात जमिनीच्या वादातून गोळीबार झाला आहे. गोळीबाराची माहिती मिळाल्यानंतर घोरावल पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले आहेत. गावात मोठया प्रमाणावर तणाव असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

- Advertisement -

अधिक तपशील प्रतीक्षेत –

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.