InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द करा; हर्षवर्धन जाधव यांचे खैरेंना आव्हान

औरंगाबादमध्ये शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यातील वाद चांगलाच तापला आहे.  चंद्रकांत खैरे यांच वय झाले असून त्यांची चेकअप करण्याची गरज आहे. पराभवाच्या छायेत असल्यामुळे खैरे यांची बुध्दी भ्रष्ट झाली आहे, म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी खैरेंवर निशाणा साधला.

मला ना सासू, ना सासऱ्याने मदत केली. मी रावसाहेब दानवे यांच्या जावयाच्या आधी रायभान जाधव यांचा मुलगा आहे. त्यामुळे ही निवडणूक मी स्वतःच्या जीवावर लढलो आहे, असे म्हणत त्यांनी खैरेंना टोमणा लावला.

खैरेंची बुद्धी भ्रष्ट झाल्याने ते असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. ज्या नेत्यांनी मदत केली असे सांगतात ते दानवे त्यांच्याच जवळचे नेते आहेत. खैरै यांना माझे आव्हान आहे की, सासऱ्यांनी मला 50 लाख दिले हे सिध्द करावे. अन्‌ ते सिद्ध झाल्यास मी सांगेल ते करायला तयार आहे, असेही जाधव म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply