प्रसिद्ध दिग्दर्शक एस शंकर यांच्या जावयावर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक एस शंकर यांच्या जावयावर पोक्सो अंतर्गत 16 वर्षाच्या मुलीवर शाररिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एस शंकर यांच्या जावयाचे नाव रोहित दामोदरन असं असून रोहित एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत.

वृत्तानुसार, रोहितच्या विरोधात पॉक्सो अॅक्टच्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण दक्षिण भारतातील एका शहरात घडले होते. पीडीतानं याप्रकरणाची दखल क्रिकेट बोर्डाशी केली होती. मात्र त्यावेळी क्रिकेट क्लबनं त्या प्रशिक्षकाची माफी मागण्यास नकार दिला होता.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितानं पुद्दुचेरी बाल कल्याण समितीमध्ये जावून तक्रार नोंदवलीय. या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांना सेक्रेटरी वेंकट आणि आणखी जणांवर गुन्हे दाखल कऱण्यात आले आहेत. त्यात एस शंकर यांच्या जावयाचाही समावेश आहे. गुन्हे दाखल झाले असले तरी अद्याप या प्रकरणामध्ये कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा