प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे. ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे.

‘आयपॅक’ ही प्रशांत किशोर यांची निवडणूक संघटना कंपनी आहे. राजकीय पक्षाकडून पैसे घेऊन राजकीय पक्षाच्या निवडणूकीसाठीची जबाबदारी ही संघटना घेते. तर एखाद्या नेत्याचा दौरा आयोजित करण्याचं काम देखील प्रशांत किशोर करतात. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे सर्व कार्यक्रम आयोजित केले होते. तर आदित्य ठाकरे यांचे अनेक दौरे त्यांनी आयोजित केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा