InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

हे आहेत जगातील महान प्रवासी

भटकंती हा जवळ-जवळ सर्वांचाच आवडता छंद. प्रत्येक जण वैयक्तिक कारणाने किंवा पर्यटनासाठी भटकंती करत असतो. सध्या दळणवळणाच्या सुविधा गतिमान झाल्याने जग अधिक जवळ आले आहे आणि प्रवासाची अनेक वेगवान, सुरक्षित साधने उपलब्ध झाली आहेत. मात्र, प्राचीन काळी सुविधा नसतानाही जीव धोक्यात घालून प्रवास करणारे अनेक महान प्रवासी होऊन गेले. त्यातील काही प्रवाशांबद्दल माहिती जाणून घेऊयात…

वास्को द गामा : पोर्तुगालचा साहसी दर्यावर्दी वास्को द गामानेच 20 मे 1498 मध्ये भारताचा शोध लावला. केप ऑफ गुड होपला वळसा घालून युरोपमधून भारताकडे जाण्याच्या सागरी मार्गाचा शोध घेत तो कालिकत बंदरात आला होता.

चार्ल्स डार्विन : उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विनलाही संशोधनाच्या निमित्ताने दीर्घ प्रवास करावा लागला. त्याने वयाच्या केवळ पाचव्या वर्षीच सागरी प्रवासात अनेक दगडगोटे, जीवजंतू, लाकडे आणि हाडे गोळा केले होते.

ख्रिस्तोफर कोलंबस : इटालियन दयावर्दी ख्रिस्तोफर कोलंबसने भारताला शोधण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचा शोध लावला. त्याने आपल्या प्रवासाची सुरुवात 1492 मध्ये स्पेनच्या पालोस बंदरापासून केली. अमेरिकेच्या शोधानंतर त्याने चार वेळा अमेरिकेचा प्रवास केला.

युरी गागरीन : बदलत्या काळानुसार मानवाने अंतराळातही झेप घेतली आणि जगातील पहिला अंतराळवीर होण्याचा मान रशियाच्या युरी गागरिनला मिळाला. वयाच्या 27 व्या वर्षी 12 एप्रिल 1969 मध्ये ‘वोस्ताक-1’ मधून त्याने अंतराळाचा प्रवास केला.

मार्को पोलो : मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने आपल्या आयुष्यात अनेक देशांचा प्रवास केला. त्याने अशा देशांचाही प्रवास केला जिथे त्याच्यापूर्वी एकही युरोपियन माणूस गेला नव्हता. मार्कोची एक व्यापारी, शोधकर्ता आणि राजदूत अशी ओळख आहे.

इब्न बतुता  : मोरोक्कोचा प्रवासी इब्न बतुता याने आफ्रिकन देश, सौदी अरेबिया, इजिप्त, सीरिया, लिबिया, इराण, क्रिमिया, बुखारा, अफगाणिस्तानसह 40 पेक्षा अधिक देशांचा त्याने प्रवास केला. तो सन 1333 मध्ये भारतात आला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply