…यामुळे राखी सावंतने केलाय पाकिस्तानी झेंड्यासोबत फोटो शेअर; पण सोशल मीडियावर होत आहे ट्रोल

राखीने पाकिस्तानी झेंड्यासोबतचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून तिचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

राखीने अपलोड केलेल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मला माझा भारत देश खूप प्रिय आहे. हा फोटो माझा आगामी चित्रपट ‘धारा 370’ मधील लोकेशनवरचा आहे. तरिदेखील तिचे चाहते तिच्यावर नाराज आहेत. या फोटोनंतर अनेकांनी तिला पाकिस्तानला जाण्याचा सल्ला देखील देऊन टाकला.

राखीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केल्यानंतर तिेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे की, “हाय फ्रेंड्स, हा एक पाकिस्तानी सेटअप वर आहे. ‘धारा 370’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट काश्मीरी पंडितांवर आधारित आहे.” त्यावेळी केलेले हे फोटो शुट आहे असे तिने स्पष्ट केले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.