नदीत तरंगणारे मृतदेह पाहून फरहान अख्तर व परिणीती चोप्रा संतापले

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा नदीत अनेक मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असतानाच मध्य एका नदीत मृतदेह आढळून आला आहे. फरहान अख्तर आणि अभिनेत्री परिणीती यांनी अश्या कृत्यांवर संताप व्यक्त केला आहे. नद्यांचे जे नुकसान होईल, त्याला जबाबदार कोण? असा त्यांनी प्रश्न केला आहे.

देशाच्या अनेक नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह तरंगताना आढळून आलेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, गंगेत 71 मृतदेह आढळलेत, मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्ह्यातील नदीतही अनेक मृतदेह तरंगताना आढळून आलेत. नदीत अशाप्रकारे मृतदेह वाहून येत असल्याने एकीकडे नद्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. हे मृतदेह कोरोना रूग्णांची असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर फरहान आणि परिणीती यांनी ट्विट केले आहे.

‘नदीत तरंगणारे आणि काठांवर वाहून येणाऱ्या मृतदेहांचा आकडा मन विचलीत करणारा आहे. एक ना एक दिवस व्हायरसचा खात्मा होईलच, पण यंत्रणांना या अपयशाची जबाबदारी घ्यावीच लागेल, ’असे ट्विट फरहानने केले आहे. परिणीती चोप्राने ट्विटमध्ये लिहिले, ‘नदीत तरंगणारे ते मृतदेह कोणाच्या आईचे, कुणाच्या पित्याचे, कुणाच्या मुलाचे होते. तुम्ही त्या नदीकाठी उभे आहात आणि तुमच्या आईचा मृतदेह नदीच्या पाण्यावर असाच तरंगताना दिसला तर तुमची अवस्था काय होईल?

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा