फरहान अख्तरचा बहुचर्चित चित्रपट ‘तुफान’ येतोय तुमच्या भेटीला

मुंबई: ‘भाग मिल्खा भाग’ फेम दमदार अभिनेता फरहान अख्तर कायम त्याच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावत असतो. फरहान अख्तर पुन्हा ‘तुफान’ या चित्रपटातून चाहत्यांना वेड लावण्यास सज्ज झाला आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तुफानच्या चर्चा सध्या जोरदार होताना दिसत आहेत.

‘तुफान’मध्ये फरहान अख्तर हा बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. फरहान अख्तर याने या भूमिकांसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘तुफान’मध्ये आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवनप्रवास रेखाटला आहे. ही प्रेरणादायी कथा मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची आहे. जिद्दीतूनच अजीज अलीचा  बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात दाखवला आहे.

‘तुफान’मध्ये फरहान अख्तर प्रमुख भूमिकेत आहे. त्याचप्रमाणे मृणाल ठाकुर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका आहेत.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा