InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

उद्धवजी, आत्ताच तुम्हाला शेतकऱ्यांचा पुळका कसा आला? – राजू शेट्टी

गेली पाच वर्षे राज्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबलेल्या नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. मात्र उद्धव ठाकरे शेतकरी प्रश्नावर एकदाही कडकशब्दात बोलले नाही मग आत्ताचं  त्यांना शेतकऱ्यांचा पुळका का आला ? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू  शेट्टी यांनी शिवसेनेला केला आहे.

राजू शेट्टी यांनी फेसबुक पेजवर ‘उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला?’ यावर पोस्ट लिहिलेली आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, ‘गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळालेला नाही. 17 जून 2017 रोजी राज्य शासनाने कर्जमाफी केली मात्र अद्यापही राज्यातील सुमारे तीस लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही.  34 हजार कोटी माफी केली असताना केवळ 19 हजार कोटींची कर्जमाफी झालेले आहे असं असताना विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काय बोलू लागला आहात असा थेट सवाल राजू शेट्टी यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे साहेब शेतकऱ्यांचा आत्ताच कसा तुम्हाला पुळका आला ?गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत…

Geplaatst door राजू आण्णा शेट्टी op Maandag 24 juni 2019

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply