“अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली पाहिजे”

मुंबई : प्रसिद्ध निरुपणकार, नामवंत साहित्यिक, विचारवंत, प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित २ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होये. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. शेवडे यांचा हा सत्कार होणार असून त्यावेळी शेवडे यांनी लिहिलेल्या डावी विषवल्ली या त्यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात मदत द्यावी, असे वक्तव्य केले. तत्पूर्वी त्यांनी टिळक शाळेला आणि पै फ्रेंड्स वाचनालयाला भेट दिली. दरम्यान पत्रकाराशी बोलताना फडणवीस यांनी अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाबाबत विधान केले.

फडणवीस यांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळबागा, पिकांच्या कापण्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी नुकसान जास्त झाले असल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान हे एनडीआरच्या नॉम्समध्ये बसते. त्यामुळे राज्य सरकारने नॉम्सनुसार पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली पाहिजे असे सांगितले. मागच्या काळात सरकारने घोषणा खूप केल्या पण मदत पोहोचली नाही असेही सांगितले. यावेळी खा.कपिल पाटील, आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार गणपत गायकवाड उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा