जालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकाराच्या जाळ्यात

रक्ताचे पाणी करुन शेतकरी शाररिक मेहनतीच्या जोरावर कसदार शेती करकत आहेत. मात्र, निसर्ग साथ देत नसल्यामुळे शेतकरी हताश होताना दिसत आहे. निसर्गाने साथ न दिल्याने आणि बँकांनी कर्ज न दिल्याने जालना जिल्ह्यातील शेतकरी खासगी सावकारी पाशात अडकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पेरणीसाठी लागणारे बियाणे घेण्यापासून ते उत्पादन झालेला माल बाजारपेठेत नेण्यापर्यंत शेतकऱ्यांना अनेक वेळा सावकारांकडून व्याजाने कर्ज घ्यावे लागते. मात्र, विकलेल्या मालाला योग्य दर न आल्याने सावकरांकडून घेतलेले कर्ज फेडणार कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. त्यामुळे पर्यायाने शेतकऱ्यांना आपली शेती या सावकारांच्या नावावर लिहून द्यावी लागते.

२१६ शेतकऱ्यांनी २७ हेक्टर ८३ आर एवढी जमीन खासगी सावकाराकडे गहाण ठेवली होती. मात्र, यातील पंधरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर झाल्या आहेत. उर्वरित 15 शेतकऱ्यांच्या जमिनी या परत करण्यासाठी सावकार टाळाटाळ करत आहेत. जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाला सावकारांनी औरंगाबादच्या विभागीय सहाय्यक निबंधक यांच्याकडे अपील केले आहे. त्यामुळे या पंधरा शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती सावकारी फास अजूनही कायम आहे.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.