‘शेतकरी कर्जमुक्ती योजना बिनकामाची’ ; राजू शेट्टी यांची राज्य सरकारवर टीका

राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमुक्ती योजना हि बिनकामाची आहे. कारण त्यामुळे १५ ते १७ टक्केच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी काल टीका केली.

….तरच महाविकास आघाडीत सहभागी होऊ – राजू शेट्टी

पत्रकारांशी बोलताना शेट्टी म्हणाले, कर्जमुक्तीसाठी लावण्यात आलेले निकष सर्व शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. राज्यातील भाजपचे सरकार खोटे बोलणारे होते. सध्या सत्तेवर असलेल्या महाविकासआघाडीस काम करण्यास काही वेळ द्यावा लागेल. त्यानंतरच सध्याच्या सरकारबद्दल मत प्रदर्शन करता येईल.

Loading...

मातोश्रीबाहेर धक्काबुक्की झालेल्या शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

सात-बारा कोरा करावा ही आमची मागणी. केंद्राचा अर्थसंकल्प अलीकडेच जाहीर झाला. परंतु या अर्थसंकल्पात कृषी आणि शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेली तरतूद कमी आहे.अडचणीत असलेल्या शेतक ऱ्यांना मदत मिळणे आवश्यक आहे. सध्या कापूस आणि तुरीच्या पिकास हमी भावापेक्षा कमी भाव बाजारात मिळत आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोलनाचा विचार यावेळी होईल, असे यावेळी शेट्टी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.