InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

- Advertisement -

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याच्या तरुण मुलाने स्वतःच्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लोहा तालुक्यातील रमणेवाडी येथे घडली. रमणेवाडीतील शेतकरी शिवाजी राजाराम केंद्रे यांना राजू शिवाजी केंद्रे (वय 32) व संजय शिवाजी केंद्रे ही दोन मुले.

घरात सातत्याने असलेली नाजूक परिस्थिती, राष्ट्रीय बॅंकेचे कर्ज आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे कंटाळून राजूने शेतात बुधवारी दुपारी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी माळाकोळी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.