प्रजासत्ताकदिनी दिल्लीत शेतक-यांची ट्रॅक्टर रॅली

दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता ६० दिवस उलटून गेलेत. केंद्रातील मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांविरोधात २६ नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेत. यानंतर आज भारताच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनी शेतकरी आपल्या न्यायासाठी दिल्लीत आंदोलन करताना दिसणार आहेत. आपल्या न्याय मागण्य़ांसाठी शेतकरी आज ट्रॅक्टर रॅली काढणार आहे.

72 व्या प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी सामील होणार आहेत. तसेच, हजारो ट्रॅक्टरची रॅलीही यावेळी काढण्यात येणार आहे. ट्रॅक्टर रॅली काढणार असल्यामुळे दिल्लीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना रॅलीचा मार्ग निश्चित करुन देण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांना काही गाईडलाईन्सही सांगितल्या आहेत.

दिल्ली पोलिसांनी रॅलीमध्ये एकूण 5000 शेतकऱ्यांना सामील होण्यास परवानगी दिलेली आहे. तसेच, ट्रॅक्टर रॅलीमध्ये जास्तीत जास्त 5000 ट्रॅक्टरचा समावेश करता येईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. ही रॅली दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेतच काढली जावी असेही दिल्ली पोलिसांनी शेतकरी नेत्यांना सांगितले आहे. तसेच रॅलीदरम्यान संमतीविना लाऊडस्पीकरवर भाषण देण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.