InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

फत्तेशिकस्त Trailer : शिवाजी महाराजांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार!

- Advertisement -

‘फर्जंद’ या ऐतिहासिक सिनेमात कोंडाजी फर्जंद यांनी गाजवलेल्या पराक्रमाची यशोगाथा मांडल्यानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फत्तेशिकस्त’ या आगामी मराठी सिनेमात स्वराज्यातील पहिला ‘सर्जिकल स्ट्राइक’ पहायला मिळणार आहे. त्यामुळे हा सिनेमा मागच्या काही काळापासून चर्चेत होता. नुकताच या बहुप्रतिक्षीत सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. यावेळी सिनेमातील कलाकारांनी ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्या वेशभूषेत स्वराज्य स्थापनेसाठीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा व त्यांना प्राणपणाने सोबत करणाऱ्या शिलेदारांचा संकल्पपट रसिकांना उलगडून दाखवला.

Loading...

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य’ निर्मितीसाठी ‘स्वराज्याचा शत्रू तो साऱ्यांचा शत्रू’ या न्यायाने लढले. ‘फत्तेशिकस्त’ हा सिनेमा शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ सिनेमातून अनुभवायला मिळणार आहे.

- Advertisement -

Loading...

शिवरायांच्या अष्टावधानी नेतृत्वाची, शौर्याची महती, त्यांच्या साथीदारांचा अजोड पराक्रम, शिस्तबद्ध आखणी या साऱ्यांचा अनुभव देणारा हा सिनेमा नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल. शिवाजी महाराजांचा प्रत्येक गुण आत्मसात करण्याची संधी या सिनेमाच्या निमित्ताने मिळाल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.

या सिनेमाचं विशेष असं की, या सिनेमात पुरुष कलाकारांच्या बरोबरीनचं महिला कलाकरांचही योगदान आहे. आजवरच्या बऱ्याच लढायांमध्ये स्त्रियांनीही पुरुषांइतकंच योगदान दिल्याची साक्ष इतिहास देतो. स्वराज्यातील लढायाही याला अपवाद नाहीत.शत्रूची बित्तंबातमी काढण्यापासून, हेरगिरी करण्यापर्यंत आणि त्यांची दिशाभूल करून प्रत्यक्ष लढाईत तलवारबाजी करण्यापर्यंत सर्वच पातळ्यांवर स्त्रीयांनी आपली शक्ती दाखवत शत्रूंना सळो की पळो करून सोडलं आहे. ‘फत्तेशिकस्त’ सिनेमातही स्त्रीशक्तीचे विविध पैलू पहायला मिळणार आहेत. यापैकी काही स्त्रिया पडद्यावर वावरताना दिसणार आहेत, तर काहींनी पडद्यामागं राहून आपलं कौशल्य पणाला लावत ‘फत्तेशिकस्त’ पडद्यावर सादर करण्याच्या आव्हानात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.हा सिनेमा येत्या 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.