Fennel Seeds | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बडीशेपचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Fennel Seeds | टीम महाराष्ट्र देशा: बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर अन्न पचण्यासाठी बडीशेपचे सेवन केले जाते. बडीशेप आपल्या आरोग्यासोबतच त्वचेसाठी (Skin) देखील खूप फायदेशीर ठरू शकते. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेची काळजी घेण्यास मदत करतात. यामध्ये अँटिबॅक्टरियल, अँटिफंगल, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयरन इत्यादी घटक आढळून येतात. बडीशेप नैसर्गिक असल्याने त्याचा वापर केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. त्वचेवरील डागांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही बडीशेपचा वापर करू शकतात. त्वचेवरील डाग (Dark spot) दूर करण्यासाठी खालील पद्धतीने बडीशेपचा वापर केला जाऊ शकतो.

बडीशेप (Fennel-For Skin Care)

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे सेवन करू शकतात. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. यासाठी तुम्हाला दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा बडीशेपचे सेवन करावे लागेल. नियमित सकाळी रिकाम्या पोटी बडीशेपचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग सहज निघून जाऊ शकतात.

बडीशेपचे पाणी (Fennel water-For Skin Care)

बडीशेपचे पाणी प्यायल्याने शरीराच्या अनेक समस्या सहज दूर होऊ शकतात. बडीशेपच्या पाण्यामध्ये आढळणारे अँटीसेप्टिक गुणधर्म बॅक्टेरियाशी लढतात आणि त्वचेवरील घाण साफ करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही नियमित बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकतात किंवा हे पाणी कोमट करून त्याने चेहरा साफ करू शकतात.

बडीशेप आणि वाफ (Fennel and steam-For Skin Care)

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही बडीशेपच्या साह्याने वाफ घेऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक लिटर पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप मिसळून घ्यावी लागेल. त्यानंतर तुम्हाला टॉवेलच्या मदतीने या पाण्यातून वाफ घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला ही प्रक्रिया साधारण दहा मिनिटे करावी लागेल. असे केल्याने चेहऱ्यावरील डाग सहज दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही बडीशेपचा वरील पद्धतीने वापर करू शकतात. त्याचबरोबर त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थांचा समावेश करू शकतात.

रताळे (Sweet potatoes-For Skin Care)

रताळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, प्रोटीन, आयरन, बीटा-कॅरोटीन आणि विटामिन सी आढळून येते, जे आरोग्यासोबत त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. रताळ्याचे नियमित सेवन केल्याने त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते.

अक्रोड (Walnuts-For Skin Care)

अक्रोड आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, सोडियम, पोटॅशियम, आयरन आणि प्रोटीन आढळून येते, जे त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. त्वचेची नैसर्गिकरित्या काळजी घेण्यासाठी अक्रोड उपयुक्त ठरू शकते. याच्या नियमित सेवनाने खराब झालेली त्वचा दुरुस्त होण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.