Fennel Seeds | बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे

Fennel Seeds | टीम महाराष्ट्र देशा: बडीशेप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्याचबरोबर बडीशेपचे पाणी देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. आरोग्यासोबत त्वचेची काळजी (Skin care) घेण्यासाठी बडीशेपचे पाणी मदत करू शकते. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील डाग, पिंपल्स इत्यादी समस्या दूर करू शकतात. यासाठी तुम्हाला एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशेप रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवावी लागेल. सकाळी उठल्यानंतर तुम्हाला हे पाणी गाळून त्याने तोंड धुवावे लागेल. नियमित असे केल्याने त्वचेच्या खालील समस्या दूर होऊ शकतात.

त्वचा चमकदार होते (The skin becomes shiny-Fennel Seeds Benefits)

नियमित बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचा चमकदार होऊ शकते. त्याचबरोबर या पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेवरील अतिरिक्त तेल साफ होते आणि तेलगट त्वचेची समस्याही दूर होते. त्यामुळे तेलकट त्वचेच्या समस्यावर मात करण्यासाठी तुम्ही नियमित बडीशेपच्या पाण्याने चेहरा स्वच्छ करू शकतात.

वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात (Signs of aging are reduced-Fennel Seeds Benefits)

तुम्ही जर वृद्धत्वाच्या लक्षणांच्या समस्येला तोंड देत असाल, तर बडीशेपच्या पाण्याने तोंड धुणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बडीशेपच्या पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. यासाठी तुम्हाला बडीशेपचे पाणी थोडेसे कोमट करून घ्यावे लागेल. या पाण्याच्या मदतीने तुमची ही समस्या सहज दूर होऊ शकते.

सूज दूर होते (The swelling goes away-Fennel Seeds Benefits)

बहुतांश लोकांना झोपेतून उठल्यानंतर डोळे सुजण्याची समस्या निर्माण होते. या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही बडीशेपच्या पाण्याने तोंड देऊ शकतात. बडीशेपमध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेला थंडावा प्रदान करतात आणि सूज कमी करतात. त्याचबरोबर या पाण्याच्या मदतीने डोळे निरोगी राहू शकतात.

बडीशेपच्या पाण्याने चेहरा धुतल्यास आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी तुम्ही खालील पेयांचे सेवन करू शकतात.

भोपळ्याचा रस (Pumpkin juice-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये त्वचा डिटॉक्स करण्यासाठी भोपळ्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. भोपळ्याच्या रसाचे सेवन केल्याने पोट थंड राहते आणि शरीर अनेक आजारांपासून दूर होते. या रसामध्ये फायबर, कॅल्शियम, विटामिन सी, झिंक भरपूर प्रमाणात आढळून येते. भोपळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने त्वचा चमकदार होते.

लेमन टी (Lemon Tea-Skin Detoxification)

उन्हाळ्यामध्ये लेमन टीचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. पोट थंड ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया मजबूत बनवण्यासाठी लेमन टी मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन ई, अँटी व्हायरल, अँटीऑक्सिडेंट, विटामिन सी गुणधर्म आढळून येतात, जे त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतात. उन्हाळ्यामध्ये नियमित याचे सेवन केल्याने त्वचा चमकदार होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.