Fenugreek Seeds | सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Fenugreek Seeds | कृषीनामा: मेथीचा वापर बहुतांश भारतीय घरांमध्ये केला जातो. मेथी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्याचबरोबर मेथी दाणे देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण मेथी दाण्यांमध्ये आयरन, विटामिन बी 6, प्रोटीन, फायबर, मॅग्नेशियम, विटामिन सी, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक माफक प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे मेथी दाणे खाल्ल्याने शरीर निरोगी राहू शकते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. रात्री पाण्यात मेथी दाणे भिजवून ठेवून सकाळी त्याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

डायबिटीस नियंत्रणात राहते (Diabetes remains under control-Benefits of Fenugreek Seeds)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाणे मदत करू शकतात. मेथीचे दाणे कार्बोहायड्रेट शोषून घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर मेथी इन्सुलिन तयार करते ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी होऊ शकते. मेथीचे दाणे टाईप 2 डायबिटीससाठी एक सर्वोत्तम उपचार आहे. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकार शक्ती वाढते (Increases immunity-Benefits of Fenugreek Seeds)

मेथी दाण्यामध्ये सॅपोनिन नावाचे संयुग आढळून येते, जे शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असते. सॅपोनिन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने शरीर विषाणू आणि बॅक्टेरियासोबत लढण्यासाठी तयार होते. परिणामी रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Benefits of Fenugreek Seeds)

मेथी दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर आढळून येते, जे पचनास मदत करते. त्याचबरोबर विरघळणाऱ्या फायबरमुळे बद्धकोष्ठताही दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने भूक कमी लागते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने मेटाबोलिजम वाढते आणि डायजेशन सिस्टीम चांगली होते. त्यामुळे रिकाम्या पोटी मेथी दाणे खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. परिणामी भूक न लागल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर कोरड्या खोकल्याच्या समस्याला झुंज देत असाल तर तुम्ही पुढील घरगुती उपाय करून बघू शकतात.

पाण्याचे माफक प्रमाणात सेवन करणे (Drink plenty of water-For Dry Cough)

जेव्हा तुम्हाला कोरडा खोकला येतो, तेव्हा तुम्ही शरीराला हायड्रेट ठेवले पाहिजे. कारण कोरडा खोकल्या आल्यावर घशात ताण निर्माण होतो आणि घशाचे स्नायू ताणले जातात. परिणामी घसा दुखण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे कोरडा खोकला झाल्यास तुम्ही माफक प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे. त्याचबरोबर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याचे देखील सेवन करू शकतात. कोमट पाण्याचे सेवन केल्याने व्हायरल इन्फेक्शन देखील दूर होऊ शकते.

वाफ (Steam-For Dry Cough)

कोरड्या खोकल्यामुळे छातीत वेदना व्हायला लागतात. या वेदना दूर करण्यासाठी तुम्ही वाफ घेऊ शकतात. वाफ घेतल्याने श्वसनक्रिया व्यवस्थित होते. वाफ घेतल्याने फुप्फुसातील रक्तसंचय दूर होतो आणि कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो.

मध (Honey-For Dry Cough)

कोरड्या खोकल्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकतात. यासाठी तुम्ही थेट मध खाऊ शकतात किंवा मधामध्ये आल्याचा रस मिसळून त्याचे सेवन करू शकतात. याचे सेवन केल्याने कोरडे खोकल्याची समस्या सहज दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Amla Juice | चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आवळ्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Papaya Smoothie | पपई स्मुदी प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Weight Gain | वजन वाढवण्यासाठी सकाळी नाश्त्यात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Bell Papper Benefits | शिमला मिरचीचे सेवन केल्याने आरोग्याला मिळू शकतात ‘हे’ आश्चर्यचकित करणारे फायदे