विदर्भातील वडसा येथे आता रेल्वेने होणार खताचा पुरवठा

विदर्भात युरिया खताचा अतिरिक्त साठा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उपलब्ध असावा. तसेच चिमूर व लगतच्या परिसरासाठी चंद्रपूर ऐवजी वडसा या ठिकाणावरून रेल्वेने खतांची उपलब्धता व्हावी, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. आजच्या खरीप पूर्व बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली.

स्वत:च्याच चित्रपटाच्या ट्रेलरवर बंदी आणण्याची ‘तापसी’ची मागणी

राज्याची महत्त्वपूर्ण अशी खरीप हंगामपूर्व बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सहभागी झालेले विजय वडेट्टीवार यांनी खताचा सुलभ व मुबलक पुरवठा होण्यासाठी वळसा या ठिकाणावरून चिमूर व अन्य भागासाठी खताची उपलब्धता व्हावी, ही मागणी मान्य करून घेतली.

Loading...

आदिवासी बांधवांसाठी केंद्र शासनाने आर्थिक मदत करावी-आदिवासी विकास मंत्री

त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना लगेच खतांची उपलब्धता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यावेळी त्यांनी जिल्ह्यामधील कापूस उत्पादकांना सीसीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) मार्फत होत असलेल्या खरेदीमध्ये जात असलेल्या अडचणी बाबतची माहिती दिली. खाजगी खरेदी बंद करण्यात यावी. ग्रेडरची संख्या वाढवावी, पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण व्हावी, फक्त शेतकऱ्यांच्याच कापसाला योग्य भाव मिळावा, तसेच कापूस खरेदी करण्यासाठी गाड्यांच्या संख्येची मर्यादा घालणे चुकीचे असल्याचे लक्षात आणून दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शवत चिमूर परिसरासाठी वळसा येथून खतपुरवठा व सीसीआयचा खरेदीमध्ये गाड्यांची मर्यादा यापुढे ठेवली जाणार नाही असे स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.