InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

5 व्यांदा खासदार झालेल्या ‘या’ महिला खासदाराची मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागणार?

भावना गवळी यांनी केलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम म्हणून यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाचव्यांदा भावना गवळी लोकसभेवर जाणार आहेत. या निवडीनंतर भावना गवळी यांची मंत्रीमंडळाकडे आगेकूच होत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात भावना गवळींची वर्णी लागणार असल्याचं बोललं जातंय.

भावना गवळी यांनी काँग्रेस आघाडीचे माणिकराव ठाकरे यांचा तब्बल सव्वा लाख मतांनी पराभव करून शिवसेनेचा हा गड कायम राखला. तर्कवितर्क आणि अफवांना पूर्णविराम देत, निकाल पूर्णपणे आपल्याकडे झुकवून भावना गवळी यांनी या मतदारसंघात सलग पाचव्यांदा विजयाची नोंद केली.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.