InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

फाइट हा चित्रपट ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला….

मराठीत सध्या वेगवेगळ्या विषयावरचे चित्रपट येत आहेत आणि या चित्रपटांना प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. मराठीत अॅक्शनपॅक्ड म्हणता येतील, असे फारच थोडे चित्रपट आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून या प्रकारच्या चित्रपटांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मराठीतील अॅक्शनपॅक्ड सिनेमाची उणीव फाइट हा चित्रपट काही प्रमाणात भरून काढणार आहे असे या चित्रपटाच्या टीमचे म्हणणे आहे.

फ्युचर एक्स प्रॉडक्शनच्या ललित ओसवाल यांनी फाइट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन पुण्याचे नवोदित तरुण अँक्शन दिग्दर्शक जिमी मोरे यांची असून त्यांचे या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण होत आहे.नव्या जुन्या कलाकारांचा उत्तम ताळमेळ आणि दमदार कथानक असलेला फाइट हा चित्रपट २० डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply