फिल्मफेअर पुरस्कार विजेत्या अभिनेत्री जयंती यांचे निधन; मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत वाहिली श्रद्धांजली

बंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री जयंती यांचे बंगळुरूतील राहत्या घरी निधन झाले. वयाच्या 76व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जयंती यांच्या निधनावर कन्नड चित्रपटसृष्टीतच नाही तर देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी देखील ट्विट करत जयंती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

‘जयंती यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अमूल्य आहे. त्यांच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना शांती लाभो’, असं म्हणत कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांनी जयंती यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जयंती यांचा जन्म 6 जानेवरी 1945 रोजी कर्नाटकमध्ये झाला. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. अभिनयाबरोबरच गायन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी काम केले होते. जयंती यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. केवळ कन्नडच नाही तर इतर सहा भाषांमधील चित्रपटांमध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या.

जयंती यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले. ‘तीन बहुरानियां’, ‘तुमसे अच्छा कौन है’ आणि ‘गुंडा’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. 60 ते 80 च्या दशकात जयंती यांनी जेमिनी गणेशन, MGR आणि जयललिता या प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा