InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

कबड्डी मास्टर्स स्पर्धेत टीम इंडियाच मास्टर…

दुबई | शनिवार, ३० जूनला झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत विश्वविजेत्या भारतीय संघाने इराणला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

या एकतर्फी सामन्यात भारताने इराणचा ४४-२६ अशा फरकाने धुव्वा उडवला.

भारताच्या विजयात कर्णधार अजय ठाकूरने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत भारतीय संघाच्या विजेतेपदात मोलाची भूमिका निभावली.

अजय ठाकूरने चढाई करताना सामन्यातील सर्वाधिक ८ गुण मिळवले. तर अजयला मोनू गोयतने ६ गुण घेत मोलाची साथ दिली.

या एकतर्फी सामन्यात भारताने इराणवर एकहाती वर्चस्व गाजवले. भारताने सामन्याच्या पहिल्या ७ मिनिटातच इराणला ऑल आऊट करत सामन्याच्या सुरवातीपासून सामन्याची सुत्रे आपल्या हाती ठेवली.

पहिल्या हाफवेळी भारतीय संघाने इराणवर १८-११ अशी आघाडी घेतली.

त्यानंतर दुसऱ्या हाफमध्येही भारताने सामन्यावरची पकड ढिली न होऊ देता इराणला नियंत्रणात ठेवले.

दुसऱ्या हाफच्या पहिल्याच  रेडमध्ये मोनू गोयतने सय्यद गफ्फारीला बाद करत पुन्हा एकदा चांगली सुरवात करून दिली.

या सामन्याच्या २४ व्या मिनिटाला भारताने पुन्हा एकदा इराणला ऑल आऊट करत आपली आघाडी २४-१२ अशी केली.

त्यानंतर भारतीय संघाने ठराविक अंतराने गुण मिळवत आपली आघाडी वाढवत सामन्यात ४४-२२ अशा फरकाने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

या स्पर्धेच्या विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे संपूर्ण स्पर्धेत वर्चस्व गाजवत विजेतेपदाला गवसणी घातली.

महत्त्वाच्या बातम्या:

आयर्लंडचे प्रतिनिधित्व केलेल्या या भारतीय खेळाडूने असा केला होता संघर्ष

आयसीसी टी20 क्रमवारीत भारताचे स्थान वधारले; आॅस्ट्रेलियाला टाकले मागे

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply