अखेर राखी सावंतचा पती आला सर्वांसमोर; ‘बिग बॉस १५’ मध्ये केली धमाकेदार एन्ट्री

मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो ‘बिग बॉस १५’ या शोमध्ये आता तीन वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्या आहेत. त्यामध्ये रश्मि देसाई, देवोलीना भट्टाचार्जी आणि राखी सावंत या अभिनेत्रींचा समावेश आहे. राखी सावंतसोबत तिचा पती रितेश देखील बिग बॉसच्या घरात पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून राखीच्या पतीचा चेहरा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक होते. आता अखेर रितेश राखीसोबत बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.

‘बिग बॉस १५’चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये राखी ‘मी बोलले होते ना माझा पती रितेश नक्की येणार इथे’ असे बोलताना दिसते. त्यानंतर ती रितेशची आरती ओवाळताना दिसते आणि म्हणते, ‘१२ मुल्कों की पुलिस, हमारे देशकी जनता आपका इंतजार कर रही थी.’ अखेर राखीचा पती सर्वांसमोर आला आहे.

राखी सावंतने जेव्हा रितेशशी लग्न केले तेव्हा ती चर्चेत होती. पण रितेशला आजपर्यंत कुणीही पाहिलेलं नाही. अनेकांनी राखीने चर्चेत येण्यासाठी केवळ खोटे लग्न केले आहे असे म्हटले होते. आता बिग बॉसच्या घरात रितेशची एण्ट्री झाली आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना राखी म्हणाली, ‘जेव्हा मी अनेकांना माझे लग्न रितेश नावाच्या एका उद्योगपतीशी झाल्याचे सांगितले तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. अनेकांनी मी खोटं बोलत आहे असे म्हटले. इतकेच काय तर हा एक पब्लिसिटी स्टंट आहे असेही अनेकांनी म्हटले. माझ्या पतीचा चेहरा लोकांना पाहायला मिळाला नाही म्हणून कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता बिग बॉस १५मध्ये धमाल पाहा.’

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा