InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

अर्थमंत्री सुधीर मनगुट्टीवारांचं भाषण सुरू, अर्थसंकल्प 2019

- Advertisement -

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज राज्य विधिमंडळात मांडला जात आहे. अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर, अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प सादर करत आहेत.

- Advertisement -

  • अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक वैशिष्ट्ये:
  • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीसाठी १०० कोटींची तरतूद
  • टक्के दिव्यांग असणाऱ्यांना सरकार घर बांधून देणार
  • मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत ४६ प्रकल्पांना मान्यता
  • अर्थसंकल्पः २ हजार ६१ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्राची यशस्वी उभारणी, उर्वरित मंडळांमध्ये काम प्रगतीपथावर
  • सायन-पनवेल महामार्गावरील पुलासाठी ७७५ कोटी रुपयांची तरतूद
  • साडेचार वर्षात २६० जलसिंचन प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता
  • बळीराजा जलसंजीवनी योजनेकरीता २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद
  • गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प डिसेंबर २०२१ पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन
  • राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ
  • काजू उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी १०० कोटींची तरतूद
  • चार कृषी विद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद
  • कृषी सिंचन योजनांसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद
  • जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद
  • जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत ८९४६ कोटींचा खर्च केल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा
  • शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी सरकारचे प्रयत्न
  • गोवर्धन योजनेत आतापर्यंत ११७ कोटी खर्च
  • शेळ्या, मेंढ्यांसाठी चारा छावण्याची निर्मिती केली
  • पिण्याच्या पाण्यासाठी राज्यात टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना
  • राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला
  • दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारकडून ४ हजार ५६३ कोटी रुपये मिळाल्याची अर्थमंत्र्यांची माहिती
  • राज्यातील दुष्काळ निवारणासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची अर्थमंत्र्यांकडून माहिती
  • अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू…
  • शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे विधानसभेच्या गॅलरीत उपस्थित
  • राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात…

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.