InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

पंतप्रधानांना पत्र लिहिणाऱ्या ‘त्या’ ४९ कलाकारांविरोधात एफआयआर दाखल

मॉब लिंचिंग म्हणजेच जमावाकडून केल्या जाणाऱ्या मारहाणीच्या प्रकरणांविरोधात पंतप्रधानांना पत्र लिहिणारे कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता या सर्व कलाकारांपुढे एक मोठी अडचण उभी राहिली आहे. देशात मॉब लिंचिंगच्या घडामोडींमुळे बिघडत असणाऱ्या वातावरणाविषयी थेट पंतप्रधानांनाच एक पत्र लिहिलं होतं. त्याच प्रकरणी आता त्या कलाकारांविरोधातील तक्रारीची नोंद अर्थात एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

मुझफ्फरपूर जिल्ह्यातील सदर पोलीस स्थानकात ४९ चित्रपट कलाकारांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच ही कारवाई करण्यात आली. वकील सुधीर ओझा यांनी गेल्या वर्षी या कलाकारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

Loading...

अनुराग कश्यप, श्याम बेनेगल, केतन मेहता, कोंकणा सेन, अपर्णा सेन, शुभा मुदगल, रामचंद्र गुहा या कलाकारांनी या पत्रात हस्ताक्षरं केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहून देशातील वाढत्या असहिष्णुतेकडे त्यांचं लक्ष वेधणं हा त्यामागचा हेतू होता.

या देशात धर्म, जात- पात आणि मॉब लिंचिगशी संबंधित घटना वाढत आहेत. या पत्रात पंतप्रधघानांच्या नावाचा उल्लेख करत यासारख्या गंभीर मुद्द्यांवर फक्त संसदेत चर्चा करण्यात अर्थ नाही, तर त्याची दखल घेतली जाणंही महत्त्वाचं असल्याचा सूर या पत्रातून आळवण्यात आला होता.

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.