मुंबईत ड्रीमलॅंड सिनेमाजवळच्या रहिवासी इमारतीला आग

ग्रॅंटरोडवरील ड्रीमलॅंड सिनेमाजवळील शांतिनिकेतन या रहिवासी इमारतीला आज सकाळी आग लागल्याची घटना समोर आली आहे. सकाळी 6 वाजता आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आठ गाड्या आणि सहा पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Loading...

आगीत अडकलेल्या सर्वच रहिवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहे. आगीने रौद्ररूप धारण केले आहे तसेच इमारतीमधून धुर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे त्यामुळे आग विझवण्यासाठी अडचण येत असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.