InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

भुसावळ येथे तरुणावर दोघांकडून गोळीबार

भुसावळ येथील खडका चौफुली भागात तरुणावर दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात खलील अली मोहम्मद शकील राहणार जळगाव हा जखमी झाला असून त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खलील अली मोहम्मद शकील हा जळगाव येथे राहणारा युवक आपल्या नातेवाइकांना भेटण्यासाठी भुसावळ येथे आला होता. रात्रीच्या सुमारास तो जळगावकडे परत जात असताना खडका चौफुलीवर विकी व त्याच्या साथीदाराने खलीलवर गोळीबार केला. या गोळीबारात खलीलच्या डाव्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. स्थानिकांनी जखमी अवस्थेत त्याला तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसून भुसावळ बाजारपेठ पोलीस संशयितांची कसून चौकशी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply