आकड्यांच्या व्यवस्थापनावर नाही तर कोरोनाच्या रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज पनवेल दौऱ्यावर आहेत. त्यांनी पनवेलमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

वाढदिवसानिमित्त रूपाली चाकणकरांनी केल कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

पनवेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण 46 टक्के आहे. जून महिन्यात पनवेलमध्ये कोरोना रुग्ण मोठया प्रमाणावर वाढले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मतभेद असले तरीही आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी-जितेंद्र आव्हाड

संख्येच्या व्यवस्थापनावर नको, तर रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. तसेच फडणवीस यांनी पनवेल महापालिकेला सुद्धा भेट दिली आणि प्रशासनाकडून सुरु असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.

दरम्यान, पनवेलमध्ये गंभीर स्थिती असून जास्तीत जास्त चाचण्या हाच एकमेव मार्ग असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.