InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

स्वतःच्या पक्षातील गॉगल गॅंगकडे लक्ष द्या – मंदार केणी

“अर्थपूर्ण तडजोड शब्द शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या तोंडी शोभत नाही. स्वाभीमानवर अर्थपूर्ण तडजोडीचा आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या पक्षातील गॉगल गॅंगकडे लक्ष देत त्यांनी भरावाच्या ठेकेदाराकडून केलेल्या अर्थपूर्ण तडजोडीची चौकशी करा. उगाच पारदर्शकतेच्या बाता मारू नका”, असे प्रत्यूत्तर स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेतून दिले.

कोळंब पुलाच्या कामाबाबत स्वाभिमानने चौकशीची मागणी केली होती. याला आमदार नाईक यांनी पारदर्शक कारभार होणार असल्याचे सांगत अर्थपूर्ण तडजोडीसाठी आरोप होत असल्यास त्याची दखल घेणार नसल्याचे उत्तर दिले होते.

याला प्रत्यूत्तर देताना  श्री. केणी म्हणाले, “कोळंब पुलाचे गेली तीन वर्षे काम सुरू असल्याने कोळंब पंचक्रोशीतील सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा. या पुलाच्या दुरुस्तीचे ढिसाळ काम ठेकेदाराकडून होत असताना त्याला एक नोटीसही बजावण्याची कार्यवाही झाली नाही.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply