टी २० मालिकेत ‘या’ खेळाडूंच्या कामगिरीवर असेल लक्ष !

भारत आणि श्रीलंका यांच्यात ५ जानेवारीपासून टी २० मालिका खेळण्यात येणार आहे. श्रीलंकेच्या या भारत दौऱ्याची सुरूवात गुवाहाटीतून होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना ७ जानेवारीला इंदोरला तर तिसरा सामना १० जानेवारीला पुण्यात होणार आहे. या मालिकेतील विशेषकरून ३ महत्त्वाच्या कामगिरीवर लक्ष असणार आहेत.

दररोज फक्त 20 मिनिटे चालण्याचे काय आहेत फायदे ?

लोकेश राहुल सध्या धमाकेदार फॉर्मात आहे. सततच्या अपयशामुळे स्थानिक त्याने काही काळ क्रिकेट सामन्यांत खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचा खेळ बहरला. विशेषत: टी २० सामन्यात त्याने सलामीला येत दमदार कामगिरी करून दाखवली.

लसिथ मलिंगा हा टी २० मालिकेत श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वाढत्या वयाबरोबरच त्याच्या कामगिरीतही सुधारणा होताना दिसते आहे. त्याच्या गोलंजाजीतील वेग कमी झाला असला, तरीही त्याच्या गोलंदाजीतील धार कमी झालेली नाही.

अजय देवगणच्या ‘भूज’ चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज !

जसप्रीत बुमराह तब्बल चार महिन्यांनंतर टीम इंडियामध्ये ‘कमबॅक’ करत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. तो तंदुरूस्त झाल्यावरही टी २० विश्वचषक २०२० लक्षात घेता त्याला अतिरिक्त काळ विश्रांती देण्यात आली होती. बुमराहच्या पुनरागमनामुळे भारताला आनंदच होणार आहे. कारण गेल्या काही टी २० सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांचा मारा शेवटच्या टप्प्यात बोथट दिसून आला.

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.