कोरोनाचे नियम पाळा आणि खूप शाॅपिंग करा : अमृता फडणवीस

मुंबई : राज्यातील काही भागांत कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होताना दिसत आहे. ज्या शहरात कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे, तिथे राज्य सरकारने निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारने पुण्यातले निर्बंध जैसे थे ठेवले आहेत. याच मुद्यावर अमृता फडणवीस यांनी विधान केलं असून पुणेकरांना एक खास सल्लाही दिला आहे.

अमृता फडणवीस यांनी आक्षेप घेत पुण्याबाबत सरकारने असा निर्णय का घेतला हे कळत नसल्याचं म्हटलं. त्याचवेळी कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीसांनी पुणेकरांना दिला. धागा हॅन्डलूम हातमागावरील कलाकारांनी अप्रतिम घडवलेल्या वस्तूंच्या महोत्सवाचे अमृता फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन पुण्यनगरीत पार पडलं. यावेळी पुण्याच्या निर्बंधाबाबत असलेल्या पुणेकरांच्या आक्षेपावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.

दरम्यान, देशात पैठणीचा कारोबार मोठा आहे. शेतीनंतर भारतात हातमाग हा मोठा व्यवसाय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखलं. देशातील स्त्रिया पैठणी ऐटीत घालतात. या क्षेत्रात 77 टक्के कामगार या स्त्रिया आहेत, असं देखील अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा