InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

‘मलंग’साठी ‘या’ अभिनेत्रीने घटवलं १२ किलो वजन

अमृता खानविलकरने ‘राझी’, ‘सत्यमेव जयते’ यांसारख्या हिंदी चित्रपटांतून भूमिका साकारत बॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता पुन्हा एकदा अमृता हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृता ‘मलंग’ चित्रपटात भूमिका साकारणार आहे.

यासाठी अमृताने तब्बल १२ किलो वजन कमी आहे. ‘मलंग’ चित्रपटांत अमृता कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण अमृताने मात्र चित्रपटातील भूमिकेसाठी अतिशय मेहनत घेतली असल्याचं दिसतंय.

Loading...

‘मलंग’ चित्रपटात अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटाणी, कुणाल खेमू जबरदस्त भूमिकेत दिसत आहेत. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ व्हॅलेंटाईन विक म्हणजेच ७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

- Advertisement -

Loading...
You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.