‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकार देशातील जनतेपासूनच लपून राहत आहे’

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. केंद्र सरकारच्या ३ कृषी कायद्याविरोधात शेतकरी २ महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. प्रजासत्ताक दिनाला या आंदोलनाला हिंसक वळण आलेले देखील सगळ्यांनी पाहिले. पण त्यानंतरही शेतकरी बांधव शांतपणे पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत.

दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलन सुरू असून बॉर्डर छावणीत रुपांतरीत करण्यात आले आहे. कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची सरकार चांगलीच कोंडी करत आहे. याचबरोबर देशभर ठीकठीकाणी आंदोलन केली जात आहेत.

दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्या वतीने देशातील विविध ठीकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे.

कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी याबाबत माहिती दिली होती. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली जाईल, याबद्दलही मोर्चानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान राज्यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनला पाठिंबा दिला आहे.चक्काजाम आंदोलनाला पाठींबा देत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सरकार देशातील जनतेपासूनच लपून राहत आहे. शेतकऱ्यांनी पुढे येऊ नये यासाठी रस्त्यावर खिळे, बॅरीकेट्स, तारांचे कुंपण लावले जात आहे. उलट शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर तासाभरात हा प्रश्न सुटला असता.’ असा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा