InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘या’ कारणास्तव प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आक्रमक

- Advertisement -

शेतकऱ्यांचे सुमारे ६०० कोटी रुपये कारखानदारांकडून येणे बाकी असल्यामुळे पुण्यात प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते आक्रमक झाले.   साखर आयुक्त कार्यालयाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्त्यांनी संकुलाच्या छतावर जाऊन घोषणाबाजी केली.

२०१८-१९मधील सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना थकीत एफ आर पी’ची रक्कम मिळावी याकरिता हे आंदोलन करण्यात आले. ३१ मे च्या अखेरीसप्रमाणे सोलापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ६०० कोटी रुपये कारखानदारांकडून येणे बाकी आहे. ऊस कारखान्यात गेल्यावर नियमाप्रमाणे १४ दिवसांच्या आत पैसे मिळणे गरजेचे असताना चार महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले गेले. हे पैसे आठ दिवसांच्या आत मिळावेत अन्यथा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अधिक तीव्र आन्दोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :

कारखानदार आणि सरकारच्या व्यवहारांची माहिती शेतकऱ्यांना कळण्याकरिता ऍप करावे.

एफआरपीची माहिती ऑनलाईन मिळावी .

- Advertisement -

शेतकऱ्यांसाठी शासनाने तयार केलेले ऍप त्वरित सुरु करावे.

 

महत्त्वाच्या बातम्या 

राज्यात आर्थिक पाहणी अहवाल सादर

स्थिर सरकार चालवण्यासाठी काही नियम-कायदे? – अजित पवार

‘आले रे आले, चोरटे आले’ म्हणत विरोधकांनी केले मुख्यमंत्र्यांना टार्गेट

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.