InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काँग्रेसला मत दिल्याने भाजप नेत्याने केला चुलत भावावर गोळीबार

हरियाणामधील भाजप नेत्याने काँग्रेसला मतदान केले म्हणून आपल्याच चुलत भावावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. धर्मेंदर सीलानी या भाजपने राजा सिंह या आपल्या चुलत भावावर गोळ्या झाल्या,

धर्मेंदर सीलानी फरार असून पोलिसांनी त्याच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. राजा सिंहला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर आहे.

धर्मेंदर सीलानी बहाद्दूरगड पालिकेचा माजी सदस्य असून तो भाजपाचा स्थानिक पदाधिकारी आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Sponsored Ads

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.