‘जबरदस्तीने पॉर्न व्हिडीओ शूट करून घेतले’; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा!

कोलकाता : राज कुंद्राला पोर्नग्राफी प्रकरणात अटक झाल्यानंतर दिवसेंदिवस या प्रकरणात वेगवेगळ्या धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. अनेकजण स्वत:हून समोर येऊन अनेक गोष्टींचा खुलासा करत आहेत. दरम्यान कोलकातामधील अभिनेत्रीला देखील वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओ शूट करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबद्दल आता त्या अभिनेत्रीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

एका वृत्तानुसार सर्व प्रथम फेसबुकवरून या तरुणीशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर तिला ऑडिशनसाठी बोलावलं आणि तिच्याकडून साडीची जाहिरात करून घेतली. त्यानंतर तिला एका वेब सीरिजची ऑफर दिली. ही ऑफर अभिनेत्रीने स्वीकारली.

परंतु सेटवर पोहोचताच तिला ही कुठलीही सीरिज नसून पॉर्न व्हिडीओ असल्याचं लक्षात आल्यामुळे अभिनेत्रीने काम करण्यात नकार दिला. मात्र मेकर्सने तिच्याकडून जबरदस्तीने पॉर्न व्हिडीओ शूट करून घेतले व निर्मात्यांनी हे व्हिडीओ पॉर्न साईट्सला विकले. सध्या ते इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. परिणामी हे व्हिडीओ रिमूव्ह व्हावे यासाठी अभिनेत्रीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली आहे. अशी माहिती पोलिसांद्वारे अभिनेत्रीचे नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात आली आहे.

अभिनेत्रीने या प्रकरणी कोलकातामधील न्यूटाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तिने मोइनाक आणि नंदिदा दत्त या दोघांची नाव घेतली आहे. तक्रार होताच हे दोघंही फरार झाले. सध्या पोलीस या दोघांचा तपास करत आहेत. या तरुणीला नक्कीच न्याय मिळेल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा