InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

जिओला विसरा आता ‘ही’ कंपनी अनलिमिटेड कॉल्स देणार फ्री

- Advertisement -

दिवाळीआधी रिलायन्स जिओने आपल्या युजर्सना दणका दिला आहे. कॉल टर्मिनेशन चार्जशी संबंधीत नियमांमुळे जिओने आपली कॉलिंग पॉलिसी बदलली आहे. त्यामुळे जिओ युजर्सना आता जिओ व्यतिरिक्त अन्य युजर्सना कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे मोजावे लागणार आहेत. याआधी ही सुविधा मोफत देण्यात आली होती. मात्र आता आणखी एका कंपनीने अनलिमिटेड कॉल फ्री देण्याची घोषणा केली आहे. व्होडाफोन-आयडिया आता आपल्या युजर्सना फ्री कॉलिंगची सुविधा देणार आहे.

Vodafone Idea Limited (VIL) ने गुरुवारी (10 ऑक्टोबर) IUC संबंधीत एक मोठी घोषणा केली आहे. युजर्सना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस (IUC) लागणार नसल्याची माहिती व्होडाफोन-आयडियाने दिली आहे. कंपनीने ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. ‘व्होडाफोनवरून अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागणार नाहीत. आम्ही तुम्हाला जे आश्वासन दिलं होतं त्याचा आनंद घ्या. व्होडाफोन अनलिमिटेड प्लॅन्सवर फ्री कॉल’ असं ट्वीट व्होडाफोनने केलं आहे.

Loading...

- Advertisement -

Loading...

व्होडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये सुरुवातीचा प्रीपेड प्लॅन 119 रुपयांचा आहे. 28 दिवस व्हॅलिडीटी, 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलची सुविधा या प्लॅनमध्ये मिळते. व्होडाफोनने आयडियाला विकत घेतल्याने जिओचा नंबर घसरला होता. व्होडाफोन आयडियाने पुन्हा एकदा सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह सबस्क्रायबर्स जोडले आहेत. ट्रायच्या अहवालानुसार व्होडाफोन आयडियाने जुलै-ऑगस्टमध्ये जिओपेक्षा जास्त ग्राहक जोडले आहेत. 31 जुलै 2019 पर्यंत Vodafone Idea चे 38 कोटी अ‍ॅक्टिव्ह ग्राहक बनले आहेत. तर जिओचे 33.4 कोटी युजर्स आहेत. भारती एअरटेलकडे 32.9 कोटी युजर्स आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.