InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी माजी खासदार दीनू बोघा यांना जन्मठेप

माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी भाजपचा माजी खासदार दीनू बोघा सोलंकी याच्यासह सातजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याशिवाय दीनू सोलंकी आणि त्याचा भाचा शिवा सोलंकी या दोघांना प्रत्येकी १५ लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अहमदाबादच्या सीबीआय कोर्टाने हा निकाल दिला. यापूर्वी शनिवारी कोर्टाने सोलंकी यांच्यासहीत सातही आरोपींना हत्या आणि षडयंत्र रचल्याप्रकरणी दोषी ठरवलं होतं.

२० जुलै २०१० रोजी गुजरात उच्च न्यायालयाच्या समोरच अमित जेठवा यांची गोळी घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुजरात पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सोलंकीला क्लिन चीट दिली होती. त्यामुळे जेठवा यांच्या वडिलांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आलं होतं. सीबीआय चौकशीत सोलंकीसहीत सातही आरोपी दोषी आढळले होते.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply