InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘आरोप करताना पुरावे देण्याची काळजी घ्या’; एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान

- Advertisement -

राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसाचे विधीमंडळ अधिवेशन झाले. या अधिवेशनात बहुमत चाचणी, विधीमंडळ नेता. विरोधी पक्षनेता निवडीची परंपरा पार पडली. यावेळी कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले यांची विधीमंडळ नेतापदी निवड झाली तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या अभिनंदनाचा ठराव झाला. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत प्रतिक्रिया देतांना माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कान टोचले आहे.

“विरोधी पक्षनेत्याकडून होणाऱ्या आरोपांचे त्याच्याकडे पुरावे असले तर त्याच्या बोलण्याला अधिक महत्व प्राप्त होते. आरोप करताना पुरावे देण्याची काळजी विरोधी पक्षनेत्याने घ्यायला हवी. विरोधी पक्षनेत्याचे पद हे शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल असते. हा नेता उद्याचा सत्ता बदल घडवून आणणार नेता आहे या दृष्टीकोनातून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यामुळेच सरकारला जाब विचारून जनतेची कामे करून घेणे, ही विरोधी पक्षनेत्याची प्रमुख जबाबदारी असते,” असं मत खडसेंनी व्यक्त केलं.

Loading...

- Advertisement -

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.