InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती झरदारी यांना अटक

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांना अटक करण्यात आली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असलेले झरदारी यांच्यावर खोटी बँक खाती उघडल्याचा आरोप ठेवून एनएबीने ही अटकेची कारवाई केली आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे.

आसिफ अली झरदारी हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती असून, २००८ ते २०१३ या काळात त्यांनी पाकिस्तानचे राष्ट्रपतीपद भूषवले होते.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.