सलग 25 वर्ष आमदार राहिलेले शिवसेनेचे माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

कोरोनाच्या काळात मनसैनिक रस्त्यावर उतरून काम करत होता ; मनसेचा सेनेला टोला

वयाच्या 70 व्या वर्षी अनिल राठोड यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाचे निदान झाल्यानंतर अहमदनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र त्यांना हृदयविकाराचा जोरदार धक्का बसला. त्यानंतर आज (बुधवार 5 ऑगस्ट) पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

दूख:द : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांच्या भावाचं कोरोनाने निधन

अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते. 2009 मध्ये त्यांच्याकडे शिवसेना उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. शिवसेना-भाजप महायुती सरकारच्या काळात त्यांच्याकडे महसूल राज्यमंत्रीपदाची धुरा होती.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.