‘पबजी’चं मिशन पूर्ण करण्यासाठी चार मुले घरातून गेली पळून

पबजीच्या नादात अनेक तरुणांनी जीव गमावल्याच्या घटनांबद्दल आपण ऐकलं आहे. आता पबजीचं मिशन पूर्ण करण्यासाठी दोन भाऊ आणि दोन बहिणी घरातील एक लाख रुपये घेऊन पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पबजी खेळताना एकच लाइफलाइन उरल्यावर खेळ पुढे सुरू ठेवण्यासाठी ५०० किलोमीटर अंतर पार करण्याचे टार्गेट दिले गेले होते. ते मिशन पूर्ण करण्यासाठी ही मुले रविवारी रात्री घरातील सर्व जण झोपले असताना गुणा रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेली.

मुले घरात नसल्याचे दुसऱ्या दिवशी सकाळी लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना सर्वत्र शोधलं. घरातील १ लाख रुपयेही गायब असल्याचं त्यांना समजलं. सर्वत्र शोध घेऊनही मुलं सापडली नाहीत. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमध्ये आणि रेल्वे स्थानकांमध्ये मुलांबद्दल माहिती दिली. पोलिसांनी रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. गुणा गावापासून अंदाजे २५० किलोमीटरवर असलेल्या ग्वाल्हेर रेल्वे स्थानकात सापडली, अशी माहिती पोलिसांनी दिली

Loading...

महत्वाच्या बातम्या-

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.