राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात राज विरोधात चार कर्मचारी देणार साक्ष, होणार मोठा खुलासा!

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. त्यातच आता राज कुंद्रा आणखी अडचणीत येणार आहे. कारण राज कुंद्राचे कर्मचारीही या प्रकरणात साक्षीदार बनणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज कुंद्राचे चार कर्मचारीच त्याच्याविरोधात साक्ष देणार आहेत. कशाप्रकारे हे रॅकेट चालायचं याची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांनी प्रॉपर्टी सेलला दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

क्राईम ब्रांचने दोन दिवसांपूर्वी राजच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या ऑफिसवर छापा मारला होता. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती एक गुप्त तिजोरी लागली. या तिजोरीमध्ये अनेक महत्वाच्या फाईल ठेवल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फाईलमध्ये राजने ब्रिटीश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या केलेल्या चौकशी तिने राज कुंद्रा याच्या मेहूण्यावर आरोप केलेत. यात तिने म्हटलं, “राज कुंद्रा याचा मेहूणा प्रदीप बक्षी हा खरा आरोपी असून तो सध्या लंडनमध्ये आहे.” ‘हॉटशॉट्स’ अ‍ॅप आणि त्यावर सुरू असलेल्या कामांमध्ये प्रदीप बक्षीचा सहभाग असल्याचं या चौकशीत शिल्पा शेट्टीनं म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा