भीषण कार अपघातात 4 हॉकी खेळाडूंचा मृत्यू

मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये सोमवारी एक मोठा अपघात घडला. एका भरधाव वेगवान कारचे नियंत्रण सुटले आणि ती झाडावर जोरदार आपटली. या अपघातात चार हॉकी खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर इतर 3 खेळाडू जबर जखमी झाले आहेत. हे खेळाडू ध्यानचंद हॉकी टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, या कारमध्ये 7 हॉकी प्लेअर्स होते. कार झाडावर आपटून अनियंत्रित झाली आणि तीने पलटी मारली. त्यानंतर ती कार रस्त्याच्या बाजूला पडली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये 4 खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. तर इतर 3 खेळाडू गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. मृतांची नावे शाहनवाज खान, आदर्श हरहुआ, आशीष लाल आणि अनिकेत अशी आहेत.

Loading...

या घटनेनंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. ट्वीट व्यक्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या. रेसलपूर गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटेत मृत्यू पावलेल्या खेळाडूंच्या नातेवाईकांच सांत्वन केलं आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेत मृत्यूमुखी पावलेल्या खेळांडूंप्रती शोक व्यक्त केला आहे.

अपघात झालेल्या कारचा एनएच-60 असा क्रमांक असून स्विफ्ट डिझाइर ही कार होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींना रूग्णालयात दाखल केलं आहे. पण त्यांची प्रकृती नाजूक आहे. गरज लागल्यास त्यांना भोपाळमध्ये स्थलांतर करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.