“फ्रांस पेगॅससची चौकशी करू शकतो, तर हिंदुस्थान का नाही? कर नाही त्याला डर कशाला”

मुंबई : देशात पेगॅसस फोन टॅपिंग प्रकरणावरून राजकारण तापलं आहे. इस्त्रायलच्या एनएसओ कंपनीने पेगॅसस हे हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करून जगातील 1400 मोबाईल क्रमांक हॅक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तर 300 भारतीय तसेच काही पत्रकारांचे देखील फोन टॅप झाल्याचा दावा 15 मीडिया संस्थांनी केलाय. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत धरलं आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेनेनंही पुन्हा सामनातून सरकारवर निशाणा साधला आहे.

“आमचं हे छोटं पाऊल इतरांना जाग आणेल, असं निवेदन ममता बॅनर्जी यांनी केलं आहे. ममता यांचं म्हणणं खरंच आहे. केंद्र सरकारने तर हातच झटकले. म्हणे पेगॅसस वगैरे झूठ आहे. अशी काही हेरगिरी झालीच नसल्याचं केंद्राने दणकून खोटं सांगितलं आहे. या प्रकरणाची चौकशी केंद्राने केली असती तर देशाला पाठकणा आणि अस्मिता आहे हे दिसलं असतं, पण पेगॅससच्या हेर मंडळात इथलेच कोणी सामील असल्याने चौकशीत भलतेच बिंग उघड्यावर येईल काय? असं सरकारला वाटलं असेल,” असं टीका शिवसेनेनं सामानातून मोदी सरकारवर केली आहे.

“फ्रान्समधील काही पत्रकारांची हेरगिरी पेगॅससने केल्याचं समोर आणताच फ्रान्स सरकारने त्या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मोरक्कोच्या गुप्तचर संघटनांनी इस्रायली पेगॅससचा वापर करून फ्रान्समधील प्रमुख पत्रकारांवर पाळत ठेवली होती. फ्रान्स सरकारने त्याबाबत मोरक्को सरकारला कडक शब्दांत जाब विचारलाच आहे आणि या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीसुद्धा सुरू केली. आपण फ्रान्सकडून फक्त महागडी राफेल विकत घेतली. पण हा निष्पक्ष आणि स्वाभिमानी बाणा घेतला नाही,” असा म्हणत शिवसेनेनं केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे.

दरम्यान, हेरगिरीमागचे सूत्रधार कोण आहेत? हे समजून घेण्याचा अधिकार देशाला आहे. फ्रान्ससारखा देश पेगॅससची चौकशी करू शकतो, तर मग हिंदुस्थानचे सरकार का नाही? कर नाही त्याला डर कशाला? हे फ्रान्सने दाखवून दिलं, असंही पुढे म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा